नवजीवन नर्सिंग स्कूल, चामोर्शीचा उज्ज्वल विजय
तालुका प्रतिनिधी चामोर्शी…. जिएनएम परीक्षेत तब्बल ११ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवत यशाची परंपरा कायम राखली.
गडचिरोली जिल्हातील नावारूपास असलेली चामोर्शी तालुक्यातील नवजीवन नर्सिंग स्कूल ने यंदाही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य नर्सिंग व परावैद्यकीय शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या तर्फे आयोजित जीएनएम अभ्यासक्रमाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात संस्थेच्या एकूण ११ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवून विद्यालयाचा मान उंचावला आहे.
*प्राप्त माहितीनुसार*
जीएनएम प्रथम वर्ष : ३ विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणीत यात प्रथम श्रध्दा मोरेश्वर राऊत, द्वितीय साक्षी देवानंद कोहळे, तृतीय सुष्मिता सुकुमार सरकार तर जीएनएम द्वितीय वर्ष : ४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत यात प्राविण्य भाग्यश्री चंदु धुडसे, प्रथम समिक्षा सत्यवान गुरनुले, द्वितीय कोमल रमेश वनपाखरे, तृतीय पुजा दुर्वास नाईक, आणि
जीएनएम तृतीय वर्ष : ४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत यात प्राविण्य प्रेमलता बकय्या सिडाम,प्रथम प्रियंका साईनाथ तांगडे, द्वितीय श्रुती राजना भक्ततु, तृतीय ज्योती सिद्धार्थ उराडे आदी विद्यार्थिनींनी यश संपादन केलेले आहे.नियमित, नियोजनबद्ध व अभ्यासकेंद्री शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची भक्कम शैक्षणिक पायाभरणी करण्यात संस्थेने मोठे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या घडणीत संस्थेतील अनुभवी अध्यापकवृंदांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
संस्थेच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत महिला व बालकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा ‘अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ नागपूर विभागातून नवजीवन नर्सिंग स्कूलला प्रदान करण्यात आला आहे. हा संस्थेसाठी मानाचा टप्पा ठरला आहे.
विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक भीमराव गोवर्धन, संस्थाध्यक्षा सौ. लताताई भीमराव गोवर्धन, प्रभारी प्राचार्य कुमारी भृणाली बावणे, अध्यापक कुमारी हर्षदा टेंभुर्णे, अमिया धोडरे, मयुरी सोयाम, सिकंदर सिडाम, विनोद येमाजवार, आशुतोष बारसगडे यांना दिले आहे.
नवजीवन नर्सिंग स्कूलचा हा शैक्षणिक व सामाजिक गौरव चामोर्शीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

