*एटापल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) चे नामकरण*
*औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते स्व.राजाराम जंबोजवार यांचे नाव देवून केला सन्मान*
एटापल्ली :-
राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत युवकांना या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.अशा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे असा आहे.राज्य शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात बदल करण्यास कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.राज्यातील अनेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) संस्थांचे नामकरण करण्यात आले त्यात समाजसुधारक,सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची नावे देण्यात आली.
त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) ला लोकनेते स्व.राजाराम जंबोजवार यांचे नाव देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
लोकनेते स्व.राजाराम जंबोजवार हे राजकारणातील वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.समाजाभिमुख राजकारण व समाजकारण करून त्यांनी अनेकांच्या समस्या सोडविल्या होत्या.असे आगळे-वेगळे व्यक्तिमत्त्व व्कचित पाहायला मिळते.
एटापल्ली तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य खर्ची पाडले.
त्यांचं राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान आहे.
महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत एटापल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाला नाव देत त्यांच्या सम्मान केला.आज ही एटापल्ली तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे.