*खेलो इंडिया आष्टीचा स्मित स्नेहा संदीप जोरगलवार राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन*
आष्टी: 69 व्या शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 मणिपूर मधील इंफाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया च्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील खेलो इंडिया च्या ग्राउंड वर नित्य सराव करीत असलेला खेळाडू स्मित स्नेहा संदीप जोरगेलवार यांने धनुर्विद्याच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल वनवैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलूभैया हकीम तसेच शाहीनताई हकीम यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाचभाई, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री भास्कर घटाळे साहेब यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी कोच म्हणून खेलो इंडियाच्या ग्राउंड वर मार्गदर्शन करणारे कु.कौमुदी श्रीरामवार हिचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले विजयी खेळाडू स्मित जोरगेलवार याने आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय महात्मा ज्योतिबा
कला महाविद्यालय आष्टीचे शरीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.श्याम कोरडे यांना दिले त्याचबरोबर सुशील अवसरमोल यांने सुद्धा अभिनंदन केले.
