*कोरची तालुक्यात एकाच मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात*
*अपघातात एकाचा मृत्यू तर ७ जखमी*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची मुख्यालयापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर साकोली कुरखेडा बस कोरची वरून १२.३० च्या सुमारास कुरखेडा जाण्यासाठी निघाली असताना मोहगाव जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिली ती धडक इतकी जबर होती की त्यामध्ये बसचा प्रचंड नुकसान झाला परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही परंतु ५ प्रवासी चालका समवेत जखमी झालेले आहेत त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले आहे व त्याच ठिकाणाहून काही अंतरावर मॅक्स चार चाकी वाहन MH 22 D 1990 चा अपघात झाला व ती गाडी पलटी झाली असून त्यामध्ये अलीटोला येथील ग्रामपंचायत येथे सचिव म्हणून कार्यरत असलेले दिलीप रामचंद्र धाकडे यांचा जागीच मृत्यू झाला त्यामध्ये ३ व्यक्ती जखमी झालेले आहेत त्या जखमींचा ग्रामीण रुग्णालय कोरची येथे उपचार सुरू आहे. या घटनेनंतर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अचानक या अपघातामुळे कोरची शहरात शोककळा पसरली आहे कारण धाकडे हे अलीटोला येथे ग्रामपंचायतचे सचिव म्हणून मागील कित्येक वर्षापासून कार्यरत होते. अपघात स्थळी झालेला अपघात हा पहिल्यांदाच नसून वेळोवेळी सदर परिसरात अपघाताची मालिका सुरूच आहे म्हणून सदर स्थळ हा अपघात प्रवण स्थळ म्हणून त्या ठिकाणी फलक लावण्यात यावा अशी मागणी कोरची तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे. या घटनेमध्ये गंभीर झालेल्या नागरिकांची प्रकृती सध्या स्थिर असून या घटनेचा तपास पोलीस स्टेशन कोरची चे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
