
AAP यूथ व CYSS टीम तर्फे राष्ट्रीय युवा दिवस आणि संविधान आर्टिकल स्पर्धेसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा
बल्लारपूर
रविवार दिनांक 12/01/2025
राजमाता जिजाऊ माँ साहेब व युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आम आदमी पक्ष शहर यूथ आणि CYSS टीम तर्फे शालेय विद्यार्थ्यांकरिता करियर मार्गदर्शन एवं 26 जानेवारीला होणाऱ्या एकतेची मशाल महोत्सव निमित्ताने होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांकरिता आयोजित संविधान आर्टिकल स्पर्धा व प्रदर्शनी संदर्भात नियम व अटींची मार्गदर्शन कार्यशाळा शहरातील PWD गेस्ट हाऊस मध्ये आयोजित करण्यात आली. यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रवक्ता आसिफ हुसेन शेख व संचालन युथ सचिव शिरिन सिद्दीकी यांनी केले. चंद्रपुर पोलिस मा. विक्की निर्वाण सर तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक रोहित जंगमवार सर यांनी विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी विद्यार्थ्यांनी या कोवळ्या वयात चुकीच्या मार्गाला न लागता जर योग्य मार्ग निवडला तर त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल हे उद्गार काढले. तसेच शहर उपाध्यक्ष सय्यद अफजल अली यांनी आम आदमी पक्षाचे एकतेची मशाल महोत्सव म्हणजे सर्व धर्म व समाजामध्ये एकजुटता आणि संविधानाच्या सन्मानाचा महोत्सव आहे असे म्हटले. आभार प्रदर्शन स्नेहा गौर यांनी केले. यावेळेस शहर कोषाध्यक्ष प्रा. प्रविण सातपुते , शिक्षण आघाडी प्रमुख अजयपाल सुर्यवंशी सर तसेच शालेय विद्यार्थी , पालकवर्ग व यूथ आणि CYSS चे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.