कोत्तागुडम (चिरेपल्ली) येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात; क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन — विजेत्यांना मान्यवरांकडून पारितोषिक वितरण
📍 अहेरी | अहेरी
तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोत्तागुडम (चिरेपल्ली) येथे वीर बाबुराव सडमेक क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य खुल्या ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. स्पर्धेला परिसरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेते तथा माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव अजय कंकडालवार यांनी प्रदान केले. द्वितीय पारितोषिक काँग्रेस सचिव हणमंतू मडावी व वनरक्षक गुरु टेकाम यांनी दिले, तर तृतीय पारितोषिक पेरमिली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मंचावर उपसरपंच रोशन कंबगोणीवार, ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट, माजी उपसरपंच भगवान मडावी, धर्मा पेंदाम, गुरुदास पेंदाम, लालू पेंदाम, मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मडावी, सचिव रवींद्र सोयाम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेमुळे ग्रामीण भागात क्रीडेला चालना मिळत असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
