राकेश तेलकुंटलवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
पारसलगोंदी येथे सुरजगड इलाका बिधिया उत्साहात संपन्न
सुमारे ७० गावांचा सहभाग; पारंपरिक पूजा विधीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन
पारसलगोंदी : सुरजगड इलाका अंतर्गत पारंपरिक बिधिया कार्यक्रम दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवारी सकाळी पारसलगोंदी गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आदिवासी परंपरेनुसार सुरजगड पट्टीतील सुमारे ७० गावांतील भूमिया पेरमा (मुख्य पारंपरिक पुजारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजा पार पडली. या पवित्र सोहळ्यास इलाक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाला सुरजगड ग्राम सभा चे सल्लागार सम्मा जेट्टी, कन्ना गोटा (पोलीस पाटील, गट्टा), राकेश कवडो (माजी उपसरपंच, पारसलगोंदी), दिलीप मडावी (पोलीस पाटील, पारसलगोंदी), घोसू हिचामी (पोलीस पाटील, मंगेर), राजू मुडुमा, बिरजू गोटा तसेच सुरजगड पट्टीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच व नागरिक उपस्थित होते.
पारंपरिक रीतीरिवाजांनुसार शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बिधिया कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे जतन, सामाजिक ऐक्य आणि परंपरांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.
