गोंडपिपरीत दारू व्यसनमुक्तीसाठी सत्संग; २९ शिवभक्तांचा कायमस्वरूपी व्यसनमुक्तीचा संकल्प
राष्ट्रसंत शेषराव महाराजांच्या कार्याची गणपती चौधरी यांची प्रेरणादायी मांडणी
चामोर्शी (गडचिरोली), दि. ७ मार्च :
चामोर्शी तालुक्यातील विहिरगाव (गोंडपिपरी) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रसंत प.पू. शेषराव महाराज मंदिरात ६ मार्च रोजी दारू व्यसनमुक्तीवर आधारित सत्संग कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश देत अनेकांना नवजीवन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्संग कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक गणपतीजी चौधरी (शिक्षक) यांनी उपस्थित गुरुबंधूंना राष्ट्रसंत प.पू. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्तीच्या महान कार्याची माहिती देत समाजातील व्यसनाधीनतेविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुन्नाजी सिडाम, सचिव – विदर्भ प.पू. शेषराव व्यसनमुक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच बालूजी पिंपळशेडे, उपाध्यक्ष – विदर्भ प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. मान्यवरांनी सत्संगाला सदिच्छा भेट देऊन नव्याने शिवभक्तीचा मार्ग स्वीकारणाऱ्या भाविकांना “नवजीवन” अर्थात पुनर्जन्माच्या शुभेच्छा दिल्या.
या सत्संगादरम्यान नवीन २९ शिवभक्तांनी कायमस्वरूपी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. कार्यक्रमात उपस्थितांनी व्यसनमुक्तीचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा निर्धारही व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल चिंताडे, प्रवीण लोडे, संजय टेकाम, प्रफुल बल्की, मनोज वाढई, सुरेश मेश्राम, प्रवीण नेवारे, दिपक नैताम, रमेश झाडे, किरण बोनगीरवार, रुपेश मेश्राम, रवींद्र येल्लेवार, अभिमान मोहुर्ले, जीवनदास निकुरे, महेश कोडापे, प्रकाश मडावी, दिपक चिंतावर, बंडू भोयर, सुरेश उमाटे, भाऊजी मेश्राम, महेश पुडके, संजय पुडके, संतोष मल्लेश, शरद चौधरी, हर्षल पाल, धीरसिंग चव्हाण, स्वप्नील बैस, प्रवीण वाकूडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
“व्यसनमुक्तीचा संदेश समाजात रुजविण्यासाठी अशा सत्संगांची गरज आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
