*वसुंधरा वाचवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा*
-प्राचार्य नंदुजी गोबाडे यांचे प्रतिपादन,तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
*कोरची:-* प्लास्टिक मुळे वसुंधरेस सर्वात मोठा धोका निर्माण होत आहे. ती नष्ट करायला हजारो वर्षे लागतात. यामुळे प्लास्टिकचा वापर टाकून वसुंधरा वाचवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे उदघाटक नंदुजी गोबाडे प्राचार्य श्रीराम विदयालय कोरची यांनी केले.
तालुक्याच्या मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल तथा जुनिअर कॉलेज बेडगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बेडगाव येथील सरपंच चेतन किरसान हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भगवंतराव विदयालयाचे मुख्याध्यापक नामदेव नागपुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अमित दास, बेडगाव शाळेचे मुख्याध्यापक चुडूराम धारणे,दामोधर बोगा, हरिश्चंद्र मडावी, देवराव मेश्राम, मनोहर मुंगमोडे, हिवराज, सोमनकर, सुनील कुळसुंगे, देविदास गुरनुले,रिनाताई गोटा,कविता गुरवेली, मंदा गोटा,दरवडे, वाढई, केंद्रप्रमुख संजय बिडवाईकर, गुणवंत हेडाऊ, मंदा आवारी, ओमराव टेम्भूर्ण आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शन नामदेव नागपुरे यांनी विज्ञान या विषयाची आवड कशी निर्माण करता येईल. या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. गरिबी आणि ज्ञानाची सांगड घालण्यात अर्थ नाही कमी गुण मिळाले तरी कोणी तेंडुलकर लता मंगेशकर होऊ शकतात. त्यामुळे स्वतःमधील कल्पनाशक्तीचा विकास करावा असेही ते म्हणाले.
विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर उद्घाटक महोदय व मान्यवरांनी संपूर्ण प्रतिकृतीचे अवलोकन केले. सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये 68 प्रतिकृती मांडल्या गेले होते. कार्यक्रमाची उद्घाटक नंदुजी गोबाडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अमित दास ,संचालन सुरज हेमके, तर आभार प्राचार्य चुडूराम धारणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक ,तालुक्यातील विज्ञान शिक्षक, शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
