खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप
एटापल्ली तालुका महिला काँग्रेसचा सामाजिक उपक्रम; कस्तूरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
एटापल्ली, प्रतिनिधी : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका महिला काँग्रेस कमिटी, एटापल्ली यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एटापल्ली येथील कस्तूरबा गांधी विद्यालयात विद्यार्थिनींना नोटबुकचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. ताराताई लोकनाथ गावडे, बेबी हेडो, जयश्री खोब्रागडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुळमेथे मॅडम, शिक्षिका शिशिका वर्ग, तसेच तालुका महिला काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले. खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.
