एटापल्लीत राष्ट्रवादीची रणशिंग फुंकली; प्रत्येक बूथवर BLA नियुक्तीचा निर्धार
डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण बैठक; आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन
एटापल्ली, प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ने एटापल्ली तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग दिला असून, प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. ५ जुलै) भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचा सक्रिय प्रतिनिधी असणे, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे, बूथ व्यवस्थापन प्रभावी करणे तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे यावर विशेष भर देण्यात आला. तळागाळातील प्रत्येक बूथवर मजबूत यंत्रणा उभी राहिल्यास पक्ष अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल आणि आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक कामगिरी करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी हिचामी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजूभाऊ चरडुके, महिला तालुकाध्यक्ष पौर्णिमाताई श्रीरामवार, बेबीताई नरोटे, अनिलभाऊ करमरकर, जनूभाऊ नल्लावार, रैजू गावडे, दामाभाऊ नरोटे, मुन्ना पुंगाटी (सरपंच, जवेली), कैलास उसेंडी (सरपंच, गुरुपल्ली), बबिताताई मडावी, लक्ष्मण नरोटे, विनोद हिचामी, बालाजी आत्राम, चेतन हिचामी, दुलसा हेडो, उमेश हिचामी, हंसराज झाडे, रामजी तेलामी, साई पुंगाटी, अमराज पुंगाटी, राजू नरोटे, रामजी कत्तीवार, मालू गावडे, दिलीप आलाम, भिवा दुर्वा, लालसू गावडे, सुगध उराडे यांच्यासह माजी सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे पदाधिकारी आणि तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम बूथ लेव्हल एजंट नियुक्त करून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आगामी निवडणुकांमध्ये अधिक जोमाने आणि संघटितपणे मैदानात उतरेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
– जनार्दन नल्लावार, एटापल्ली प्रतिनिधी
