
आलापल्ली सिरोंचा रस्त्याचे काम दर्जेदार व जलद गतीने करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी अधीक्षक अभियंता बोरकर यांच्याकडे केली.
गडचिरोली:- राष्ट्रीय महामार्ग मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता बोरकर कार्यकारी अभियंता राऊत व इतर अन्य डेप्युटी इंजिनियर व जुनियर इंजिनियर यांनी आलापल्ली सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची तपासणी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी राष्ट्रीय महामार्गाचे संथ गतीने चालणारे कामाविषयीं नाराजगी व्यक्त केली. रेंगाळत चालणाऱ्या कामामुळे होणाऱ्या विविध समस्या व पावसाळ्यात होणाऱ्या अडचणीच्या विषयावर ही चर्चा केली.. आलापल्ली सिरोंचा मार्गावरील काम तात्काळ जलद गतीने सुरू व्हावी अशी विनंती केली.अन्यथा नाईलाजाने 28 तारखेपासून सर्वपक्षीय रास्ता रोखो आंदोलन करणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली.