
६ वर्षांनंतर मुलचेरा तालुक्यातील मलेझरी येथे नाट्यप्रयोग.
मुलचेरा/गडचिरोली:- राजे छत्रपतीं शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ अडपल्ली चेक( मलेझरी) च्या सोजण्याने जिल्हा परीषद प्रार्थमिक शाळेच्या भव्य पटागणावर कष्टाची शिदोरी या नाटकाचे आयोजन लोकांच्या आग्रहास्तव ६ वर्षानंतर कऱण्यात आले होते या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून मनसे युवा नेता संदीप भाऊ कोरेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष, राकेश बेलसरे शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट सह उद्घाटक गौरव बाला विशेष अतिथी सोनु वाकुडकर जिल्हा उपाधक्ष मनसे रेखाताई कन्नके सरपंच अडपल्लि माल, मायाताई कोरडे, पोलीस पाटील, कपिल पाल, ग्राम पंचायत सदस्य आष्टी, व ईतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे
उद्घाटक म्हणून बोलताना मनसे युवा नेता संदीप कोरेत म्हणाले की झाडीपट्टी नाट्य पूर्ण विदर्भातील ग्रामीण भागात मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे कलाकाराच्या कलेचे व्यासपीठ म्हणजे नाटक होय या कलेच्या माध्यमातून मनोरंजन सोबत प्रबोधन सुद्धा केले जाते व जनमानसात या नाटका बद्दल उत्साह पण दिसून येत आहे.या कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्य प्रमाणावर अश्या नाटकाचे आयोजन करणे काळाची गरज आहे.असे आपल्या उद्घाटननीय भाषणात बोलले. तद नंतर उपस्थीत मान्यवरांनी पणं मार्गदर्शन पर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे अध्यक्ष सचिन राऊत, उपाधक्ष अतुल झाडे, सचिव बंडू चौधरी सह सचिव आकाश आभारे, शरद कुबडे, मारोती झाडे, शुभम चौधरी, आकाश चॅलावर, आकाश राऊत व ईतर समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले