रिपब्लिकन पक्षात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश; गडचिरोलीत जिल्हा कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न
रोहिदास राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा; जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन
गडचिरोली :
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. गडचिरोली येथील विश्रामगृहात आयोजित जिल्हा कार्यकर्ता बैठकीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सदस्यत्व पावती व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनीता रायपुरे, वर्षा कन्नाके, माधुरी कोरवते, भास्कर गजभिये, अविनाश तुरे, निरंजन उमरे, मुरलीधर मेश्राम, शरद निकुरे आदींचा समावेश होता. रिपब्लिकन पक्ष हा गरीब व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा आणि नेहमी संघर्ष करणारा पक्ष असल्याने आपण या पक्षात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्ह्यातील विविध सामाजिक व स्थानिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना रोहिदास राऊत यांनी रिपब्लिकन पक्षाचा संघर्षमय इतिहास सांगत दलित-शोषित समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. संघर्ष हेच रिपब्लिकन पक्षाचे दुसरे नाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुरेखाताई बारसागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव राजन बोरकर, केशव सामृतवार, जिल्हासचिव प्रल्हाद रायपूरे, विधानसभा क्षेत्र प्रभारी प्रदीप भैसारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निता सहारे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष क्रिष्णा चौधरी, तैलेश बांबोडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, सचिव पुण्यवान सोरते, गडचिरोली तालुका अध्यक्ष पुंजाराम जांभूळकर, सचिव अरुण भैसारे, आरमोरी अध्यक्ष तुळशीदास नंदेश्वर, जिल्हा संघटक हेमंत सहारे, महिला संघटिका डॉ. अंकिता धाकडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव खोब्रागडे, चंद्रभान राऊत, दादाजी धाकडे, प्रेमेंद्र सहारे, लता येरमे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेश सचिव राजन बोरकर यांनी बैठकीचे संचालन केले तर जिल्हासचिव प्रल्हाद रायपुरे यांनी आभार प्रदर्शन केले.
