आष्टी पोलिसांनी अवैध दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या
सात लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
चामोर्शी/भास्कर फरकडे
आष्टी :- देशी दारूची तस्करी होत असल्याचे गुप्त माहिती वरुन जैरामपूर जंगल परिसरात आष्टी पोलीसांनी दि १० जानेवारी ला रात्रोचे सुमारास सापळा लावून पिक अप वाहनातून अवैध देशी दारू पकडली व वाहनचालकास अटक केली आहे वाहनचालक आरोपीचे नाव आकाश शंकर पारखी वय ३० रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर असे आहे अपराध क्र.१०/२०२६ कलम ६५ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाईत २८०० निपा किंमत दोन लाख चोविस हजार रुपयाची देशी दारू व जुन्या वापरातील पिक अप वाहन किंमत पाच लाख रुपये असा एकूण सात लाख चोविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीसांनी केली अधिक तपास पोहवा रतन एम रॉय करीत आहेत
