जिल्ह्यातील दुर्गम भागात आनंदाची बस सेवा.
मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी येथील नागरिकांच्या मागणीला यश.
निलिमा बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
गडचिरोली:- गडचिरोली हा अविकसित,अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरु केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी गावांसाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार ‘राज्य परिवहन महामंडळा’ने बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. या बस फेन्यांमुळे ग्रामस्थांच्या चेहयावर हास्य फुलले असून ही बस त्यांच्यासाठी ‘आनंदाची बससेवा ठरली आहे.
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी, रांगी ग्रामस्थांनी रुग्ण, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी बस सुरू करण्याबाबत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत ‘राज्य परिवहन महामंडळा’च्या गडचिरोली विभागीय नियंत्रक यांना बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी व रांगी गावांसह या गावांच्या मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, बस फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.
रा. प. गडचिरोली विभागातील धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे तीन नियतांमार्फत दहा फेया, पेंढरीकरिता तीन नियतांमार्फत आठ फेल्या आणि रांगीकरिता दोन नियतांमार्फत सहा फेन्या सुरु आहेत. मुरूमगाव येथून दैनंदिन २८५, पेंढरी येथून दैनदिन ३३५ आणि रांगी येथून दैनंदिन २४२ प्रवासी प्रवास करतात. बस फेन्या सुरू झाल्यामुळे या गावांतील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामे, दवाखान्यासाठी जाणे सोयीचे झाले आहे. ही गावे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटची गावे असून या गावांतून नऊ किमी अंतरावर छत्तीसगढ़ राज्य आहे. अशा अतिदुर्गम भागातील गावकऱ्यांची सोय या बस फेन्यांमुळे झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवून मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसांत अतिदुर्गम भागांत मुख्यमंत्र्यांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून गडचिरोली आता नक्षलग्रस्त नाही, तर विकासाच्या मार्गावर गतीने धावणार असल्याचे दाखवून दिले आहे.
