
महावाचन उत्सव -2024 उपक्रमात कोरचीच्या विद्यार्थ्यांनी दोन गटात पटकाविले अव्वल स्थान
*कोरची:- जितेंद्र सहारे*
महावाचन उत्सव- 2024 उपक्रमांतर्गत सन- 2024-25 मध्ये (इयत्ता तिसरी ते बारावी)तील विद्यार्थ्यांसाठी तीन गटात विभागणी करून अ गट-( इयत्ता तीन ते पाच ), ब गट-(सहा ते आठ )व क गट-(नऊ ते बारा )या गटांमध्ये शाळा स्तरावर प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या” आवडत्या पुस्तकांचे सारांश लेखन “स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरावर परीक्षकांमार्फत परीक्षण करून जिल्हास्तरावर तिन्ही गटातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सादर करण्यात आली. त्यामध्ये अ गटात( इयत्ता 3 ते 5 )यामध्ये कु. सपना बुध्देसिंग नैताम वर्ग -5 वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामणारा हिचा प्रथम क्रमांक तसेच ब गटातून (इयत्ता सहा ते आठ )यामध्ये कु. सोनाली घनश्याम दुधनांग इयत्ता -8वी एकलव्य मॉडेल स्कूल कोरची यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
दिनांक 13/1/2025 ला तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तरावर गटसाधन केंद्र कोरची येथे ठिक 12.00 वा.पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला .सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमित दास गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरची, हिराजी रामटेके सर केंद्रप्रमुख कोरची तथा गटसमन्वयक गट साधन केंद्र कोरची,विनायक लिंगायत विषय साधन व्यक्ती गट साधन केंद्र कोरची ,शयोगेंद्र शुक्ला विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र कोरची हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तालुका स्तरावर अ गटातून कु. सपना बुध्देसिंग नैताम- प्रथम ,भूषण रुपेश गंगा भोईर -द्वितीय व आर्यन समजू ताडाम -तृतीय ब गटातून कु.चांदणी रामेश्वर आदे- प्रथम कु.सोनाली घनश्याम दुधनांग -द्वितीय व कु.चेतना साहू कोरचा- तृतीय तसेच क गटातून कु. हंसिका टेमसिंग टेकाम -प्रथम कु.भाग्यश्री अंकालू बघवा- द्वितीय व कु. कोमल ज्ञानेश्वर मांदाडे- तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पारितोषिक स्वरूपात पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रमोद वाढणकर विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र कोरची यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांना चहा व बिस्कीट देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी मोलाचे सहकार्य केले व अशात-हेने ठीक 2.00 वाजता कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.