रापेल्ली येथील अवैध कोंबडा बाजारावर पेरमिली पोलिसांची धाड; 3 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त तर 16 आरोपींवर गुन्हा दाखल.
पेरमिली(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या उप-पोलीस स्टेशन पेरमिलीच्या हद्दीतील रापेल्ली गावात अवैध रितीने कोंबडा बाजार भरवून जुगार खेळणाऱ्यांवर धाड टाकून पेरमिली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिसरात पेरमिली पोलिसांनी पहिल्यांदाच सर्वात मोठी कारवाई केली आहे.
सदर कारवाईत 16 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 11 दुचाकींसह एकूण 3 लाख 85 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पेरमिली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पेरमिली हद्दीतील 12 किमी अंतरावर असलेल्या रापल्ली गावाच्या बाहेर असलेल्या एका मोकळ्या सार्वजनिक जागेत मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची झुंज लावून पैशाचा जुगार खेळला जात होता. या माहितीची खातरजमा करून पेरमिली पोलिसांनी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. पोलीस दाखल होताच जुगार खेळणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून 16 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर २१/२०२५ कलम १२(ब) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल आरोपी :-
1) रैनू आत्राम रा. रापल्ले,
2) राकेश आत्राम, रा आरेंदा,
3) अर्जुन कोडापे रा पेरमिली,
4) आकाश आत्राम रा पेरमिली,
5) विपुल आत्राम रा पेरमिली,
6) राजू मडावी येरमणार,
7) मंगेश आत्राम रा येरमणार,
8) पेन्ता आत्राम रा आरेंदा,
9) देस्सू तलांडी रा गुर्जा,
10) किशोर आत्राम रा येरमणार,
11) मोहन आत्राम रा. येरमणार टोला,
12) संकेत मडावी रा पेरमिली,
13) मोतीराम तलांडी रा रापल्ले,
14) दलसू आत्राम रा येरमणार,
15) लालू आत्राम रा. येरमणार टोला,
16) रूपेश सडमेक रा पेरमिली ता. अहेरी
मोठा मुद्देमाल जप्त.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे.
11 दुचाकी:- ज्यामध्ये विना नंबरच्या गाड्यांसह एम.एच.33 पासिंगच्या विविध मोटारसायकलचा समावेश आहे (किंमत अंदाजे 3.79 लाख रुपये).
रोख रक्कम: आरोपींच्या अंगझडतीतून एकूण 2240 रुपये रोख जप्त करण्यात आले.
साहित्य: झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या पायाला बांधण्याच्या लोखंडी कात्या व इतर साहित्य असा एकूण 3,81,340/- रुपयांचा (अंदाजे 3.85 लाख) मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोनूने, पोलीस शिपाई गणेश भर्रे, सरय्या गांधामवार, संदीप ठवकर, संजय तोकलवाड आणि दर्शन उंदीरवाडे यांचा समावेश होता.
अवैध धंद्यांवर व जुगार खेळणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
