मेडपल्ली ग्रामपंचायतील शेतकऱ्यांना वर्मी कल्चर वितरण.
पेरमिली(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मेडपल्ली ,कोरेल्ली खुर्दे, कासमपल्ली गुर्जा बु, कोरेल्ली बु इत्यादी गावातील शेतकऱ्यांना दि. 18 डिसेंबर रोजी गांडूळ वितरण करण्यात आले. अती प्रभावित मेगा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प अंतर्गत, बायफ संस्था आणि भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान (BRLF) यांच्या सहकार्याने अंमलबजावणी सुरू आहे . याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आजीविकेचा विकास व शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे.दरम्यान शेतकऱ्यांना गांडूळ बेडची आवश्यकता, गांडूळ खताची निर्मिती प्रक्रिया आणि त्याचा शेतीतील उपयोग यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. गांडूळने आरोग्य सुधारते, सेंद्रिय पदार्थांची वाढ होते आणि उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते. या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला. वर्मी खताचे वापर केल्यास त्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेती अधिक शाश्वत बनेल. यातून त्यांना आर्थिक सक्षमता मिळण्यास मदत होईल व आजच्या बेसुमार रासायनिक खतांचा वापर करण्याच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातून विषमुक्त अन्न तयार होवून शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारेल या विषयावर माहिती देऊन शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे वर्मी देण्यात आले.
या उपक्रमाच्या प्रचार आणि प्रचारासाठी केंद्र समन्वयक अलका तलांडे, मिथुन दुर्गे, प्रेरक बाबुराव तलांडी, लालसु तलांडी, संजय आत्राम आदीनी परिश्रम घेतले. यावेळी शेतकऱ्यांना वर्मी बेडच्या वापराबद्दलची सखोल माहिती मिळाली. प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार केला जात आहे.
