दारव्हा तालुक्यातील बोथ येथील घटनेने यवतमाळ जिल्हा हादरला!.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी खुद शेजारच्या घरात प्रवेश करताच घटनेचा झाला उलगडा.
जया लाभसेटवार
उपसंपादिका यवतमाळ
दारव्हा(यवतमाळ):– माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ गावात उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या एका सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह चक्क शेजाऱ्याच्या घरात एका पोत्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेचा यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः लक्ष दिल्याने अवघ्या 24 तासात या घटनेचा उलगडा झाला आहे.
दारव्हा तालुक्यातील बोथ या गावांमधील कुमारी शिवानी पंकज जाधव वय वर्ष सात ही मुलगी दिनांक दिनांक 20 मार्च रोजी दुपारी तीन वाजता पासून बेपत्ता असल्याने त्या मुलीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु मुलगी कुठेही आढळून न आल्याने त्यांनी शेवटी दारव्हा पोलीस स्टेशन गाठले आणि मुलगी बेपत्ता असल्याबाबत दारव्हा पोलिसांना माहिती दिली दारव्हा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रकरण अतिशय गांभीयनि घेऊन पोलिसांचे पथक बोथ या गावांमध्ये पोहोचले आणि तपासाला सुरुवात झाली परंतु नातेवाईक गावकरी आणि पोलीस यांनी रात्रभर शोध घेतल्यानंतरही बेपत्ता असलेल्या मुलीचा पत्ता न लागल्याने मुलीची अपहरण झाली असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू झाली दिनांक 21 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, दारव्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ दंगल नियंत्रण पथक आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी बोथ या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप दिले. गावांमध्ये जवळपास अधिकाऱ्यांसह दीडशे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. संपूर्ण शेत शिवार गावातील विहिरी शेतातील विहिरी शोधल्यानंतरही मुलीचा पत्ता लागला नाही पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत सर्च ऑपरेशन सुरुवात केल्यानंतर सर्च ऑपरेशन दरम्यान शेजाऱ्यांनी घरात जाऊ नका घरात जाऊ न देण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची शंका अधिकच बळावली आणि त्या ठिकाणी दस्तर खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सहकार्यासह घरात प्रवेश केला. घराची पाहणी सुरू असताना पलंगाच्या खाली एका बोरीमध्ये त्या मुलीचा मृतदेह होता. पोलिसांनी त्या बोरी मध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्या बोरीमध्ये टरबूज असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी ती बोरी बाहेर काढताच त्या बोरीमध्येच त्या निरागस मुलीचा मृतदेह आढळून आला मृतदेह दिसताच पोलिसांनी आरोपी यांना ताब्यात घेतले आणि शेजारीच त्या मुलीचा मारेकरी निघाला समाजमन सुन्न करणारी ही घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या घटनेला घेऊन हळूहळू व्यक्त केल्या जात आहे याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी सोनू जाधव आणि कैलास जाधव या आरोपींना दारव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवप्रकाश मुळे ठाणेदार दारव्हा व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी करीत आहे.
शेजाऱ्यांनी घरात जाऊ न दिल्याने पोलिसांना आली शंका.
सर्च ऑपरेशन दरम्यान शेजाऱ्यांनी घरात जाऊ नका घरात जाऊ न देण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची शंका अधिकच बळावली आणि त्या ठिकाणी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सहकार्यासह घरात प्रवेश करताच सदर प्रकरणाचा उलगडा झाला.
पोलिसांनी ठेवले होते २५ हजारांचे बक्षिस.
बोथ येथील चिमुकली शुक्रवारी (दि. २०) पासून बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्यासाठी यवतमाळ पोलिसांनी २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. समाज माध्यमांवर तसे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, २४ तासांच्या आतच शनिवारी (दि. २१) शेजारच्याच घरी गळा चिरल्याच्या अवस्थेत एका पोत्यात तिचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
बोथ गावात पोलीस छावणीचे स्वरूप.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, दारव्हा पोलिस स्टेशनचे ठाणेदार मुळे यांच्यासह श्वान पथकासह फॉरेन्सिक आणि सीआयडीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावात तीव्र संताप आणि तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी तत्काळ ‘जलद कृती दलाला’ (क्यूआरटी) पाचारण केले असून, सध्या गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात आहे. या घटनेमुळे गावातील जनमन ढवळून निघाले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
