बायफ अहेरी व BRLF नागपुर यांचा पुढाकार; येरमनार येथील शेतकऱ्याची पर्यावरण पोषक उद्योजक म्हणून निवड.
पेरमिली(गडचिरोली):- अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पा ची अंमलबजावणी बायफ संस्था पुणे व BRLF दिल्ली यांच्या संयुक्त पुढाकाराने अहेरी तालुक्यातील 20 ग्रामपंचायत मध्ये सुरू झाली आहे. या प्रकल्पा मधील उपजीविका या उपक्रमांतर्गत शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन, कुकूट पालन करणाऱ्या 20 लोकांची प्रात्यक्षिक शेतकरी म्हणून निवड करण्यात आली होती व यांच्या सोबत एक वर्षा पासून काम सुरू आहे या मधून एक शेतकरी पोच्या पेंटा तलांडी येरमनार यांची पर्यावरण पोषक उद्योजक म्हणून निवड करून त्यांना 2 बेरारी बोकड , शेड व भाजीपाला रोपटे रोपवाटिका साठी साहित्य सहाय्य करण्यात आले आहे.
या उद्योग मध्ये गावातील पारंपारिक बकरी पालन मध्ये सुधारणा करून चांगल्या जातीच्या, आपल्या भागातील वातावरणात बकऱ्याची पैदास तयार व्हावी व या मधून शेतकऱ्यांची उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी उच्च प्रतीचे 2 बोकड देण्यात आले आहेत. यांनी बोकडाचे संगोपन व्यवस्थापन करावे व दुसऱ्या शेतकऱ्यां कडील बकरी पालन धारक यांना सेवा देऊन आपला व्यवसाय करावा. तसेच भाजीपाला रोपटे रोपवाटिका तयार करून चांगल्या जातीची रोपे भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध विक्री करून व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.
यासाठी मदत,मार्गदर्शन बायफ संस्था अहेरी चे मंगेश कुडे प्रकल्प अधिकारी, अतुल डोर्लीकर उपजीविका अधिकारी,प्रेरक लालसु तलांडी यांचे कडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
