सामाजिक युवा कार्यकर्ता आयुष पंदिलवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आष्टी : येथील प्रसिद्ध सामाजिक युवा कार्यकर्ते आयुष पंदिलवार यांचा वाढदिवस हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथे मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील मान्यवर, युवक मंडळाचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सामाजिक युवा कार्यकर्ता आयुष पंदिलवार यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन पंदिलवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
