‘समृद्ध पंचायतराज’ अभियानाला चालना; गुरुपल्ली येथे 18 मार्चला सत्यपाल महाराजांचा प्रेरणादायी कार्यक्रम
एटापल्ली, प्रतिनिधी :
एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे ग्रामीण विकास व समाजजागृतीला चालना देण्यासाठी सुप्रसिद्ध खंजेरी वादक व समाजप्रबोधनकार यांचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता गुरुपल्ली येथे होणार असून तो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शाश्वत विकास, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती आणि सकारात्मक विचार याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्यपाल महाराज आपल्या खंजेरी वादनासह प्रभावी कीर्तन व प्रबोधनातून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून , मुख्य कार्यकारी अधिकारी, उपस्थित राहणार आहेत.
परिसरातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
