भामरागड तालुक्यातील केळमारा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
भामरागड:- क्रिकेट हा खेळ सांघिक भावनेतून खेळला जातो.क्रिकेट खेळल्याने शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळून बुद्धीचा विकास होतो. क्रिकेट खेळ हा एकल खेळ नसून एक संघ बनवून खेळावे लागतो सांघिक खेळ एकतेच्या भावनेतून खेळून आपल्या गावाचा नाव जिल्ह्यात नावलौकिक करा असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी केले आहेत.
भामरागड तालुक्यातील केळमारा येते आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश मडावी, सह उदघाटक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शैला आत्राम, माजी सरपंच गोविंदा इष्टाम, तर प्रमुख पाहुणे म्हणून बिरजू आत्राम, वंदना आत्राम, लीला मडावी,कमला मडावी, निर्मला मडावी,रामसाई मडावी, राजु मडावी, सुरेश मडावी आदी उपस्थित होते.
पुढे म्हणाले की, मी बहुतांश गावात स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित असतो पन केळमारा गांवात असल्या सारखं पटांगण पूर्ण विधानसभेत बोटावर मोजण्याइतकेच आहे त्यात तालुका मुख्यालय सोडला तर अशे पटांगण कुठेच नाही त्यामुळे खेळाच्या माध्यमातून जिल्हयात आपल्या गावाची ओळख निर्माण करा जेणकरून मोठे मोठे टीम या छोट्याश्या गावात स्पर्धेत सहभाग घेतले पाहिजे असे बोलले. उपस्थित मान्यवरांनी सुध्दा आपापले मनोगत व्यक्त केले.
सदर स्पर्धेत एकूण 56 चमूनी आपला सहभाग नोंदविला असून गावात दहा ते पंधरा दिवस खेळाच्या माध्यमाने रेलचेल असतो.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक देशु इष्टाम तर संचालन व आभार अर्जुन आलाम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गण सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक महिला, पुरुष,युवक व क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.