आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एटापल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन
पंतंजली योग समितीची प्रशासनाला सहकार्याची विनंती
राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली, दि. १५ जून २०२६ : आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून, एटापल्ली येथे हा दिवस भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात पतंजली योग समिती, तालुका एटापल्ली यांच्या वतीने विविध शासकीय विभागांना सहकार्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी श्री. महादेव आ. करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन तहसील कार्यालय भवन, एटापल्ली येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन योगाचे महत्त्व जाणून घ्येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
