
घरकुल लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.
निलिमा बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
अहेरी(गडचिरोली):– महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दिनांक 05 ऑक्टोंबर, 2018, 17 नोव्हेंबर, 2018 या अधिसूचना नुसार आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकरीता शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तीस तहसिलदाराची लेखी पुर्ण परवानगी घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेषतः राखीव ठेवण्यात आलेल्या वाळूघाटापैकी या प्रयोजनासाठी निश्चित केलेल्या वाळूघाटातून कोणतीही फी किंवा स्वामित्वधन न आकारता गृहनिमार्ण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे घराचे बांधकामासाठी पाच ब्रासपेक्षा अधिक नाही एवढी वाळू काढण्यास परवानगी देता येईल, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय अधिसूचना दिनांक 28 मार्च, 2020 अन्वये पर्यावरण अनुमती घेण्यापासून 13 बाबीना सूट देण्यात आलेली असून परिशिष्ट-9 मधील एकुण 13 बाबी मध्ये मुद्दा क्रमांक 4 वर उपरोक्त बाबीचा पत्रामध्ये समावेश आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल मंजूर लाभार्थ्यांना 5 ब्रासपेक्षा अधिक नाही एवढी रेती काढण्यास Zero Royalty पास उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश दिलेले आहे.
तहसीलदार अहेरी त्यांच्या पत्रानुसार संदर्भ क्रमांक 5 अन्वये केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व वातावरणीय बदल मंत्रालय अधिसुनचना दिनांक 28/03/2020 मधील परिशिष्ट 9 मुददा क्रमांक 4 नुसार ग्रामपंचायतीच्या हद्यीत असलेल्या स्रोतापासुन वाळु/रेतीच्या किंवा सामुदायीक वापरासाठी रेती निष्कासनास पर्यावरण अनुमती घेण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे. तसेच संदर्भिय क्रमांक 6 अन्वये शासकीय आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल स्वामीत्वधन न आकारता जवळच्या वाळु गटातुन वाळु उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तहसिलदार यांना ऑफलाईन पासेस उपलब्ध करुन द्यावेत व सदर ऑफलाईन पास तलाठी यांच्यामार्फत घरकुल लाभाथ्यांना घरपोच उपलब्ध करुन घेनेबाबत सुचना निर्गमीत करण्यात आलेले आहे.
अहेरी तालुक्यातील मौजा आवलमरी (प्राणहिता नदी) किष्टापूर नाला, कॉजेड नाला, जिमलगट्टा नाला, झिमेला नाला, दामरंचा (बांडिया नदी), पेरमिली नाला, बोरी (प्राणहिता नदी), महागांव बु. (प्राणहिता नदी), जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे प्रस्तावीत घाट वगळून), मोदूमतूर्रा स.(प्राणहिता नदी), येडमपल्ली नाला, राजाराम नाला, रेगूलवाही सिलमपल्ली नाला, वांगेपल्ली (प्राणहिता नदी), वेलगूर नाला या ठिकाणावर रेती साठा उपलब्ध नसल्यामुळे त्या ऐवजी महागाव बु. येथील रेतीघाटातुन रेती उचल करतील असे बदल करण्यात आले आहे. या रेतीघाटातून शासनाच्या घरकुल योजना मंजुर झालेल्या लार्भाध्यांना 5 ब्रास Zero Royalty मोफत रेती देण्याचे आदेश तहसीलदार अहेरी कडून सर्व तलाठ्यांना देण्यात आले आहे.
Zero Royalty वाहतूक पासेस तहसील कार्यालयाकडून तलाठी कडे सुपुर्द करण्यात आले आहे. सदर परवान्याची मुदत ही दि. 12 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत अंमलात राहील,
साज्यातील तलाठ्यांनी संबंधित ग्रामसेवकांमार्फत लाभार्थ्यांशी संपर्क साधून लाभार्थ्यांस वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी नेमूद दिलेल्या दिनांकास घाटातून वाळू उत्खनन व वाहतुक पुर्ण करण्याची कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच तलाठ्यांनी वाहतूक पास देतांना वाहतूक पासवर वाळू उत्खनन करावयाची वेळ,वाळूचे परिमाण (ब्रास मध्ये),ज्या वाहनातून वाळू वाहतूक करणार त्या वाहनाची माहिती व ज्या वाळू घाटातून उत्खनन करावयाचे आहे ते स्थळ, ठिकाण,कालावधी,नमुद करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने दिनांक 19 मार्च रोजी महसूल मंडळ कार्यालय पेरमिली येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास रेतीचे वाहतूक पास (TP) देण्यात आले.यावेळी पेरमिली ग्रामपंचायत सरपंचा किरण नैताम, शिल्पा मडावी तलाठी पेरमिली, रवी मेश्राम तलाठी कोडसेपल्ली/पल्ले/कोरेली, संकेत कुमोटी तलाठी चौडमपल्ली, तेजस घाटघुमार तलाठी येरमनार, कोतवाल वासुदेव कोडापे, वारलु आत्राम हे उपस्थित होते. घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर आदेश आणि आधार कार्ड संबंधित तलाठ्याकडे देऊन मोफत 5 ब्रास रेती चा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.