
माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आष्टी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अ. प.) प्रवेश
दिनांक 14 ऑगस्ट रोजी विश्रामगृह गडचिरोली येथे आष्टी येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला.राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे कुशल नेतृत्व आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला असून धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकत सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय धोरणे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे आमदार धर्मराव बाबा यांनी सांगितले. पक्षप्रवेशाच्या वेळी राखी राजेंद्र मडावी, सरोज अभय बोंडे, अमोल सुरेश कन्नाके, समय्या पोचम बसूला,नेनाजी आत्माराम बोगरे, अजय हरिपद नंदी, सुमित शिवपद हलदर,अरबाज इस्माईल शेख,अमोल अमर अशोक गुरुनुले, आर्यन खेमदेव गोडबोले, रितिक महेशकर,अजय कांबळे,निखिल मडावी गिरीश नागुलवार,सुनील आत्राम,शालिक आत्राम, चंद्रवैभव आत्राम आदींनी पक्षप्रवेश केला यावेळेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.