लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथिल प्रकल्पाकरिता मौजा चंदनखेडी व उमरी येथिल पर्यावरण दुषित भुमी अधिग्रहण जमिनी देण्यास विरोध
*प्लांट चे आधुनिकीकरण व विस्तारीकरण न करणेबाबत.*
भास्कर फरकडे उपसंचालक इंद्रावती विदर्भ टाइम्स
चामोर्शी : तालुक्यातील कोनसरी येथे उदयास आलेली लॉयड मेटल्स कंपनीचा विस्तार झाल्यास भूपृष्ठावरील जल, जंगल, जमिन व शेती त्याचबरोबर मानवी जीवनावर या कंपनीच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय चंदनखेडी अंतर्गत मौजा चंदनखेडी, उमरी, भुमकी व खर्डी रिठ हे गांवातील लोक शेती प्रधान असून गांवातील बहुतेक कुटुंब हे शेती करून आपला उदरनिर्वाह करित आहेत. शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय बसुन शेतीवरच त्यांचे जिवनमान अवलंबून बाहे. कंपनीच्या प्रकल्पाकरिता आपली शेती देऊन भूमिहीन होण्यास गावातील नागरिक तयार नाहीत. सदर कंपनीमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होऊन पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे. शिवाय नागरिकांची सुद्धा दमा, श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात आरोग्याची हानी होणार आहे.
त्याचबरोबर शेतक:यांची जमिन शासनाने अधिग्रहण करण्याचा विचार केल्यास ग्रामपंचायत चंदनखेडी परिसरातील जमिन भूसंपादित होऊ देणार नाही. शासनाला किंवा कोणत्याही कंपनीला आमची जमिन देणार नाही. आमची सुपीक जमिन आमच्या शेती उपयोगाची आहे आणि आमचा वडिलोपार्जित उदरनिर्वाह याच जमिनीवर होत आहे. त्यामुळे जमिन भुसंपादनास व विद्यमान प्लांट चे आधुनिकीकरण व बिस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावास सर्व शेतकरी व शेतमजूर यांचा पूर्णपणे तीव्र विरोध करून ठराव सर्वानुमते मंजूर करित आहे. असा ठराव ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेला आहे यावेळेस गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते