UPSC मध्ये रजत वाळके यांचे दैदीप्यमान यश; 514 वी रँक मिळवत गडचिरोलीचा मान उंचावला
मौशिखांब–मुरमाडी जि.प. क्षेत्रातील लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार मित्रपरिवाराकडून सत्कार; युवकांसाठी प्रेरणादायी यश
गडचिरोली : प्रतिनिधी
देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत गडचिरोली येथील रजत वाळके यांनी 514 वी रँक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक राज्य व देशपातळीवर उंचावला आहे.
रजत वाळके यांच्या या यशाबद्दल मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंदभाऊ कात्रटवार यांनी रजत वाळके यांचे अभिनंदन करताना सांगितले की, गडचिरोली जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी रजत वाळके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. हे यश गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे रजत वाळके यांनी आपल्या यशातून दाखवून दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सत्कार कार्यक्रमाला यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर आदी उपस्थित होते.
युवकांसाठी प्रेरणादायी ठरले यश
रजत वाळके यांच्या या यशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक युवकांना नवी प्रेरणा मिळाली असून जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
