भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली येथे क्रांतीविर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बाबुराव शेडमाके जयंतीला अभिवादन
एटापल्लीतील भगवंतराव महाविद्यालयात क्रांतीविर बाबुराव शेडमाके जयंती कार्यक्रम
एटापल्ली : येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १२ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे यांच्या हस्ते क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. सुधीर भगत, प्रा. डॉ. बाळकृष्ण कोंगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदिप मैंद, प्रा. डॉ. विश्वनाथ दरेकार, प्रा. डॉ. निलेश दुर्गे, प्रा. डॉ. राजीव डांगे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रृती गुब्बावार, प्रा. राहुल ढबाले, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. चिन्ना पुंगाटी, प्रा. अतुल बारसागडे, प्रा. डॉ. स्वाती तंतरपाळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या कार्याची व देशभक्तीची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
