
लाईड्स मेटलचे व्यवस्थापिक संचालक बी. प्रभाकरन यांची ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ सन्मानासाठी निवड
‘लोकमत’तर्फे लंडन येथे होणार बी. प्रभाकरन यांचा गौरव
१८ ऑगस्टला ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’चे आयोजन
राकेश तेलकुंटलवार एटापल्ली प्रतिनिधी
गडचिरोली – जिल्ह्यातील लायडंस मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिज उत्खनन करण्याबरोबरच बी. प्रभाकरन यांनी एटापल्ली सारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना सोयी सुविधा बरोबर आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच बरोबर एका पोलिस जवानाला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्या पोलिस जवानाला बी. प्रभाकरन यांनी स्वतः हेलीकाॅफ्टर चालवून त्या पोलिस जवानाला नागपूर येथे पोहचले व त्या पोलिस जवानाचे प्राण वाचवले. असे बी. प्रभाकरन यांचे जिल्ह्यात सामाजिक कार्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्याकरिता बी. प्रभाकरन यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी लंडन येथे आयोजित ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’मध्ये लायंडस मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना हा सन्मान बहाल करण्यात येईल.