राकेश तेलकुंटलवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
कोंदावाही येथे ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचा शानदार समारोप; प्रज्वल नागुलवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण
विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके; शेकडो ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
एटापल्ली (प्रतिनिधी):
एटापल्ली तालुक्यातील मौजा कोंदावाही येथे दिनांक 17 मार्च 2026, मंगळवार रोजी आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे काँग्रेस नेते प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डोलेश मडावी, सुधाकर गोटा, सैन्यू मटामी, चिन्ना वेलादी, कोलू तलांडे, संतोष बिरंमवार, महारू तलांडे, लुला तलांडे यांची उपस्थिती लाभली. तसेच महेश बिरंमवार, बंडू तलांडे, राजू तलांडे यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली. प्रथम पारितोषिक रुपये 20,000/- माननीय अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात आले. द्वितीय पारितोषिक रुपये 15,000/- डोलेश मडावी व अजय भाऊ गावडे यांच्या कडून, तर तृतीय पारितोषिक रुपये 10,000/- हणमंतु मडावी साहेब व प्रज्वल नागुलवार यांच्या कडून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
