अहेरी:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मौजा – कोंदावाही येथे 6 ऑक्टोंबर रोजी जय काटी, वेल्ली याया पेन चा सन 2024 या वर्षाचा वार्षिक पेन पुंगाह पुजा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाचे वार्षिक पेन पुंगाह पुजा हे आदिवासी समाजाचा संस्कृती नुसार पारंपारिक रूढी, प्रथा, परंपरा पद्धतीने पेन पुंगाह पुजा परराज्यसह जिल्ह्यातील लाखो भाविकांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी जय काटी, वेल्ली याया पेन चे – पेन मुखिया, भुमीया, एल्ले कोटे, पुजारी, पेरमा, वड्डे, तुडमा, आक्को – काक्को सह जय काटी, वेल्ली पेन मध्ये येणारे तलांडी आणि गट्टी (गावडे) परिवारातील सर्व नागरिक तसेच एटापल्ली, अहेरी, भामरागड तालुक्यातील आणि छत्तीसगड राज्यतून आदिवासी समाजासह इतरही नागरीक पेन पुंगाह पुजेला लाखोच्या संख्येने उपस्थित होते.