हिंगणघाट तालुक्यात अनेक तरुण अडकले फसवणुकीच्या जाळ्यात!
सदर प्रकरणात दोन प्राध्यापकांचा समावेश असल्याचे चर्चा.
हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यात मनी लॉन्ड्री घोटाळा सुरू असल्याचे चर्चा सुरू असून या रॅकेटमध्ये दोन प्राध्यापक, एक फोटोग्राफर आणि एक मायक्रो फायनान्स संस्थेत काम करणारा कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. ग्राहकांचे अकाउंट्स महिन्याला दहा हजार रुपये भाड्याने घेऊन मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्याचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक तरुण या फसवणुकीला बळी पडत आहेत.
सदर टोळीने ग्राहकांना विश्वासात घेऊन पैशाचे आमिष दाखवित आहेत.त्यांच्याकडून नवीन बँक खाते उघडून घेत आहे. सदर खात्यांचे पासबुक, चेकबुक आणि आधार कार्ड हे सर्व कागदपत्रे त्यांनी स्वतःकडेच ठेवत आहेत. त्यानंतर त्या खात्यांद्वारे ऑनलाईन व्यवहार करून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण केली जात असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात एका नॅशनलाइज्ड बँकेतील तब्बल 200 हून अधिक बँक खाते फ्रीझ करण्यात आले आहेत. खात्यांमधील व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद रकमांची हालचाल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.सदर घोटाळ्यात एका नामांकित कॉलेजचे दोन प्राध्यापक सदर घोटाळ्यात मास्टर माईंड असल्याचे बोलले जात आहे. या प्राध्यापकांनी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढल्याचे काही जाणकाराकडून माहिती मिळत आहे.
या प्रकरणामुळे अनेक निष्पाप नागरिक आणि विद्यार्थी फसवणुकीच्या जाळ्यात अडकले असून शहरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस विभागाने सदर प्रकरणाचा चौकशी केल्यास अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविले जात आहे.
