गडचिरोलीच्या युवकांना जागतिक कौशल्याची नवी झेप; ४०० विद्यार्थ्यांना पदवी व थेट रोजगार
– अमृता फडणवीस यांचे एलएमजीएसईच्या उपक्रमांचे कौतुक; लॉयड्सकडून ‘फ्लाइंग स्कूल’ची घोषणा
राकेश तेलकुंटलवार
तालुका प्रतिनिधी, एटापल्ली
गडचिरोली : गडचिरोलीतील युवक-युवतींसाठी ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिप’ (एलएमजीएसई) तर्फे उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास सुविधांमुळे दुर्गम भागातील तरुणांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध बँकर व समाजसेविका यांनी केले. एलएमजीएसईतर्फे आयोजित भव्य पदवीदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी विविध तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४०० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व विद्यार्थ्यांना लॉयड्स समूहामध्ये थेट रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, “दुर्गम भागातील मुलींना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी एलएमजीएसईने उचललेले पाऊल हे खऱ्या अर्थाने सामाजिक विकासाचे उदाहरण आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आणि औद्योगिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्याची त्यांची तयारी प्रेरणादायी आहे.”
अध्यक्षीय भाषणात बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीतील लॉयड्स-कर्टिन कार्यक्रमाची यशोगाथा मांडली. या पहिल्या बॅचमधील स्थानिक आदिवासी विद्यार्थी याने मधून ‘इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप’ विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा व राहण्याचा संपूर्ण खर्च लॉयड्सने उचलला असून, गडचिरोलीतील युवकाने परदेशातून अशी पदवी मिळविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे कार्य एलएमजीएसईमार्फत सुरू असल्याचे प्रभाकरन यांनी सांगितले. तसेच लॉयड्समध्ये रोजगार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ईएसओपी (ESOP) योजनेअंतर्गत कंपनीचे समभाग देऊन त्यांना कंपनीचे भागीदार बनविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी भारतात प्रथमच महिला चालकांसाठी शौचालय सुविधेसह सुसज्ज ट्रेलर ट्रक सुरू करण्यात आल्याची माहिती देत, भविष्यात गडचिरोलीमध्ये ‘फ्लाइंग स्कूल’ सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणाही त्यांनी केली.
यावेळी लॉयड्सच्या विविध लोककल्याणकारी प्रकल्पांचे डिजिटल उद्घाटन करण्यात आले. यामध्ये लॉयड्स एकलव्य वसतिगृह, लॉयड्स शक्ती वसतिगृह, लॉयड्स भोजनालय, लॉयड्स ड्रायव्हिंग स्कूल, लॉयड्स सक्षम गॅरेज तसेच एलएमजीएसईच्या अधिकृत संकेतस्थळाचा समावेश होता.
हेडरी येथे सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेल्या बहुविशेषता रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या भव्य पदवीदान सोहळ्यामुळे गडचिरोलीतील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधींचे दालन खुले झाले असून, जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
