गडचिरोली पोलीस भरतीची मैदानी चाचणी यशस्वीरित्या संपन्न
७१७ पोलीस शिपाई व २७ चालक पदांसाठी २०,७९७ उमेदवारांची सहभागिता; अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक
गडचिरोली (प्रतिनिधी) :
गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२६) तसेच चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आलेली मैदानी (शारीरिक) चाचणी आज दि. ७ मार्च २०२६ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर सुरळीतपणे संपन्न झाली.
या भरती प्रक्रियेत ७१७ पोलीस शिपाई पदांसाठी एकूण २३,७९१ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३,६७४ पुरुष व ६,५७३ महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. त्यामधून १२,६३१ पुरुष व ५,७४३ महिला, असे एकूण १८,३७४ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.
तसेच २७ चालक पोलीस शिपाई पदांसाठी एकूण ३,२९६ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी २,३४७ पुरुष व ४५२ महिला उमेदवार चाचणीसाठी हजर झाले. यापैकी २,०९९ पुरुष व ३२४ महिला, असे २,४२३ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी पूर्ण केली.
दोन्ही भरती प्रक्रियेत मिळून एकूण २०,७९७ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.
🚓 चालक पदासाठी वाहन कौशल्य चाचणी सुरू
चालक पोलीस शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एमआयडीसी मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्या उपस्थितीत सुरू असून १० मार्च २०२६ पर्यंत सुमारे ५७५ उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे.
📊 गुणांची यादी संकेतस्थळावर
मैदानी चाचणी झालेल्या उमेदवारांचे गुण दुसऱ्याच दिवशी गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले.
तसेच लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी आणि परीक्षेचा दिनांक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
💻 अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पारदर्शक प्रक्रिया
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
PST Digital Physical Standard Test द्वारे छाती व उंची मोजमाप
RFID तंत्रज्ञान वापरून १६०० मीटर (पुरुष), ८०० मीटर (महिला) व १०० मीटर धावणे
Prism Technology द्वारे गोळाफेक चाचणी
मैदानावरच तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
👮 ५५१ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त
संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी ६९ पोलीस अधिकारी व ४८२ अंमलदार असे एकूण ५५१ मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. सर्व चाचण्या सुरळीत पार पडल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने शहीद पांडू आलाम सभागृहात स्नेहभोजन (बडाखाना) आयोजित करण्यात आले.
⭐ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही भरती प्रक्रिया पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
त्यांना अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकूल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप व रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व अधिकारी-अंमलदारांचे कौतुक केले.
