कोलंबोत आज भारत-पाकिस्तान महामुकाबला.
मुंबई:- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला आज रविवारी आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. कारण स्पर्धेच्या 27 व्या गट-सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या हाय-व्होल्टेज सामन्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागली होती. हा सामना फक्त पॉइंट्स टेबलसाठीच नाही, तर सन्मान आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या वेळी आयसीसीने या सामन्याबाबत एक खास उपक्रम राबवला आहे.ज्यामध्ये ते आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा सामना मोफत थेट प्रसारित करणार आहेत.पहिल्यांदाच असा मोठा सामना यूट्यूबवर मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.ज्यामुळे जगभरातील प्रेक्षक कोणत्याही सब्सक्रिप्शनशिवाय सामना पाहण्याचा आनंद लुटू शकतील.
आत्तापर्यंत दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयरथ कायम ठेवला आहे. अशा स्थितीत आज कोणत्या ना कोणत्या संघाला पराभवाची चव चाखावी लागणार आहे. गुणतालिकेत टीम इंडिया सध्या पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान विजय मिळवून आपली स्थिती अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना अत्यंत रोमांचक आणि चुरशीचा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हा सामना 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
सामन्याची वेळ
सामना संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. तर टॉस 6:30 वाजता होईल.
टीव्हीवर सामना कुठे पाहता येईल?
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
प्रेक्षक हा सामना जिओहॉटस्टार अॅपद्वारे आपल्या मोबाईल किंवा टॅबलेटवर पाहू शकतात.
YouTube वरही मोफत लाइव्ह
ICC आपल्या अधिकृत YouTube चॅनेलवर भारत-पाकिस्तान सामना मोफत थेट दाखवणार आहे.
