सौ.निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
अकोला:- बार्शिटाकळी शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे ७८ व्या स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी पार पडला. शाळेतील तिन्ही शिक्षिकांपैकी एकही महिला शिक्षिका राष्ट्रध्वजाच्या देखरेखीसाठी शाळेत न थांबता सर्व नियम धाब्यावर बसवून शाळेच्या वर्गखोल्यांना कुलूप लावून अकोला येथे निघून गेल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख या बाहेरगावी गेल्याने शाळेतील राष्ट्रध्वज दिवसभर बेवारस स्थितीत होता. संध्याकाळचे ६:४० वाजले तरी राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला नाही.शिवाय त्याठिकाणी शाळेच्या महिला शिक्षिका हजर नसल्याची माहिती काही व्यक्तींना मिळाली. हा प्रकार तहसिलदार राजेश वझीरे, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे व शिक्षण विस्तार अधिकारी संदिप मालवे यांना दिली.त्यांनी एका शिक्षिकेला फोन लावला.रात्री ७:३० वाजता धोत्रे व काळणे नामक दोन महिला शिक्षिका हजर झाल्या. त्यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज उतरवण्यात आला.याप्रकरणाची गंभीर दखल घेत बार्शिटाकळी पोलीसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला.रात्री उशीरापर्यंत लेखी जबाब नोंदवण्यात आले.याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या विरूध्द नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे तिन्ही शिक्षिकांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्याविरूध्द राष्ट्रध्वज अवमान झाल्याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे अशी माहिती संदीप मालवे, शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. बार्शिटाकळी यांनी दिली.
पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सांगितलं की, राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी भांदवि कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.