
पेरमिली(गडचिरोली):– अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान दिल्ली, ऑक्सिस बँक व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील 20 ग्रामपंचायत मधील 69 गावात प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्प खाली खरीप हंगाम 2025-26 मध्ये 140 धानाचे डेमो धारक लाभार्थी व 36 भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच एकात्मिक बोडी प्रक्रिया या तिन्ही उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक विरहित व्यवस्थापन चा एक भाग तसेच शेती मधील खर्च कमी करणे, उत्पन्न वाढ करणे, यासाठी गावामधील उपलब्ध औषध उक्त दहा झाडाचे पाने, गोमूत्र वापर करून दसपर्णी अर्क, लिंबोली अर्क, जीवामृत, इत्यादी माहिती, फायदे, महत्त्व सांगून प्रात्यक्षिक मेडपल्ली ग्रामपंचायत मधील श्री पद्धत धान डेमो धारक शेतकरी सिताराम बिच्चु मेश्राम या लाभार्थ्यांकडे बायफ च्या टीमने दिले. व अशा प्रकारची प्रकल्प गावात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण माहिती बायफ संस्थे चे प्रकल्प अधिकारी कुडे यांनी दिली तर कार्यक्रमाचे प्रस्तावना केंद्र समन्वयक अल्का तलांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी CRP बाबुराव तलाडी यांनी सहकार्य केले.
या संपूर्ण कार्यक्रमाला मेडपल्ली मधील महिला, पुरुष यांनी भरभरून प्रतिसाद दिला.