अहेरी तालुक्यातील कोडसेपल्ली येथे बोडी व मजगी च्या कामाचे भूमिपूजन.
पेरमिली(गडचिरोली):- बायफ व भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान आणि एक्सिस बँक यांच्या संयुक्त अंमलबजावनी सुरू असलेल्या अती प्रभावित मेगा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प अंतर्गत नागरिकांच्या सहभागातून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होते. सदर आराखड्यातील काम मंजूर असून या मधील कोडसेपल्ली येथील मधुकर मासा तलांडी यांची मजगी व कोरके गुंडा आत्राम यांची बोडी कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामाचे भूमिपूजन दि. 31 डिसेंबर रोजी गावाचे पाटील मालू तलांडी, माजी सरपंच वंजा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही संपूर्ण कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मधून करण्यात येणार आहेत. यासाठी 45 लोकांची मागणी प्रमाणे त्यांचे मस्टर काढून घेण्यात आले व काम सुरू करण्यात आले.
शेतकरी व मजूर यांनी गावातच काम मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. या प्रसंगी प्रकल्प अधिकारी कुडे, डोर्लीकर, अलका तलांडे, रोजगार सेवक समाधान तलांडे, प्रेरक संजय आत्राम,बाबुराव तलांडी व शेतकरी उपस्थित होते.
