अहेरीत गुढीपाडव्याचा उत्साह; डॉ. अजय कंकडालवार यांनी घरी उभारली गुढी
नववर्षानिमित्त नागरिकांना दिल्या हार्दिक शुभेच्छा; शहरासह ग्रामीण भागात उत्साहपूर्ण वातावरण
अहेरी (प्रतिनिधी) :
गुढीपाडवा निमित्त अहेरी येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी सपत्नीक आपल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले.
यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत येणारे वर्ष सुख, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना केली. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रमुख सण असून, या दिवशी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
अहेरी शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी घरोघरी गुढी उभारून सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी मंदाबाई रामय्याजी कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अथर्व मल्लेलवार, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
