राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवाचा मान
उत्कृष्ट कार्याची दखल; सुरज येगलोपवार यांचा विभागीय आदर्श म्हणून सत्कार
गडचिरोली, दि. १ मे : महाराष्ट्र दिनाच्या शुभप्रसंगी उत्कृष्ट कार्याची दखल घेत लाहेरी येथील प्रयोग वैज्ञानिक अधिकारी श्री. सुरज येगलोपवार यांचा विभागीय आदर्श म्हणून गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे लाहेरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा सन्मान मा. सहपालकमंत्री मा. आशिष जयस्वाल यांच्या तसेच जिल्हाधिकारी मा. अविशांत पांडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरव सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
श्री. सुरज येगलोपवार यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि उत्कृष्ट कार्यशैलीच्या जोरावर हा बहुमान मिळवला आहे. शासकीय सेवेत प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, लाहेरी परिसरासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे नाव त्यांनी उंचावले आहे.
भविष्यातही त्यांच्या हातून अशीच उल्लेखनीय कामगिरी घडत राहो, तसेच समाजासाठी प्रेरणादायी कार्य सुरू राहावे, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
