कलेच्या जोरावर सचिन गावडेचा राज्यस्तरीय युवा महोत्सवात झेंडा
आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात भगवंतराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची दमदार भरारी
एटापल्ली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव ‘भरारी – २०२६’ स्पर्धेत भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्लीच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी सचिन मिरवा गावडे याने मातीकला या कलाप्रकारात प्रथम क्रमांक तर स्थळचित्र या कलाप्रकारात तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सचिन गावडे याचा सत्कार करण्यात आला. या यशात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल ढबाले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बूटे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
