*जांभळी येथे तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलन साजरा*
*खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो:आमदार रामदास मसराम*
*कोरची:-* खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो तसेच विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार शिक्षकच टाकतात, असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले. पंचायत समिती
कोरची तालुका अंतर्गत शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन दिनांक १७ते १९ डिसेंबर दरम्यान जि. प. उच्च प्राथमिक शाळा, जांभळी येथे करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आमदार मसराम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनात खेळ व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व विषद केले.
समारंभाध्यक्षा सरपंचा धनाय मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रशांत गड्डम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल मडावी, उपसरपंच मोहन कुमरे, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे कोरचीचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,व करखेडा तालुकाध्यक्ष जिवन नाट, प्रभाकर तुलावी, धनपाल मिसार, माजी पंचायत समिती सदस्य सदाराम नु्रुटी,रामसुराम काटेंगे, संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, कृष्णा नरडंगे, प्रतापसिंह गजभिये,गटशिक्षणाधिकारी अमित दास, मधुकर नखाते, सुरज हेमके, चेतन किरसान, उषा वरकडे, सन्नुजी मडावी, प्रमिला बन्सोड, जगदेव बोगा, बिरसु कमरो, प्रेमलाल जोगी, सुदाराम मडावी, श्रीराम मडावी, सोमा काटेंगे, सरीता पडोटी, गितेश्वरी मडावी, आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सर्वांगीण विकास साधणे ही काळाजी गरज आहे. म्हणुन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास सोबत भावनीक, शारीरिक व सामाजिक विकास घडवुन आणण्यासाठी तालुका स्तरीय शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक कला सम्मेलन घडवून आणणे महत्वाचे आहे.असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले आहे.
तालुका स्तरीय शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक कला संमेलनात पाच ही केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या सांस्कृतिक झाक्या प्रदर्शित केले होते. त्यामुळे गावकरी, शिक्षक, मान्यवर व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. तसेच जांभळी केंद्रातील शिक्षकांनी बेटी-बचाव या विषयी सुंदर रांगोळी काढलेली होती.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल मडावी यांनी आपल्या मार्गदर्शनात आ.रामदास मसराम यांना गावातील समस्या व जांभळी येथील जि. प.शाळेत असलेले शिक्षकाचे रिक्त पद तातडीने भरावेत अशी मागणी केली. या तीन दिवसीय संमेलनात विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्राचे संचालन केशव प्रास्ताविक भोंडे, गटशिक्षणाधिकारी अमित दास तर आभार नरेश रामटेके यांनी मानले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवुन आपली कला व क्रीडा कौशल्य सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जांभळी येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
