*प्राध्यापक टिकले यांचा निरोप समारंभ संपन्न*
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा
कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे कार्यरत असलेले दिनकर आसाराम टिकले यांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले .त्या कारणास्तव महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील प्राचार्य संजय फुलझेले, पर्यवेक्षक डि.बी.घाटबांधे, बि.के. राठोड, व्हि.आय.पोलोजी, हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राध्यापक टिकले यांच्या सेवेतील काळाच्या स्मृतींना उजाळा दिला.मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांची गौरवशाली कारकिर्द नेहमी स्मरणात राहिल असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रा.सुधाकर किरमिरे, .संतोष राठोड, गौरव उंदिरवाडे, तर हायस्कूल विभागातून अंजली कोडमलवार, नंदा मिलमिले, सुशील अवसरमोल, अनिल पिसे, अंक्लेश रोहनकर,मान्तेश रत्नावार, विनोद भूरसे श्रीनिवासन वेनमपल्ली शिक्षकेत्तर कर्मचारी मधुन वरिष्ठ लिपिक राजु पोटवार, कनिष्ठ लिपिक राजेश्वर बर्लावार, शिपाई लक्ष्मण दुरशेट्टी,बंडू दडजाम, योगेश दिवटेवार आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र इंगोले व आभार प्रदर्शन श्रीकांत मल्लेलवार यांनी केले.
