
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे डॉ. रंगनाथन जयंती साजरी
आष्टी (प्रतिनिधी) – दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे आधुनिक ग्रंथालय विज्ञानाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय विज्ञानात दिलेल्या मूलभूत योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. “आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात सुद्धा ग्रंथालयाचे स्थान अद्वितीय आहे. माहितीच्या महासागरात मार्गदर्शन करणारे केंद्र म्हणजेच ग्रंथालय आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रवी शास्त्रकार यांनी मानले.
कार्यक्रमाने उपस्थितांना डॉ. रंगनाथन यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाची जाणीव करून दिली.