
*रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत कोरची तालुक्यातील टाहकाटोला येथील शिक्षक गौरव कावळे यांचे विभाग स्तरावर प्रथम क्रमांक*
*कोरची :- जितेंद्र सहारे*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाहकाटोला येथील शिक्षक गौरव कावळे यांनी विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविले यामुळे गट साधन कोरचीच्या वतीने गौरव कावळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या