
*कोरची तालुक्यातील कुमकोटच्या मंडईत उसळली भाविकांची गर्दी*
*60 गावची देवी राजमाता राजराजेश्वरी यांना हजारो भक्तांनी घातले साकडे*
*कोरची :- जितेंद्र सहारे*
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोरची तालुक्यातील कुमकोट येथे आज 8 जानेवारीला मंडईचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य म्हणजे तालुक्यातील मंडईची सुरुवात कुमकोट येथील राजमाता राजराजेश्वरी यांना साकडे घालून करण्यात येते. या वर्षी सुद्धा कुमकोट येथील मंडईला नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. कोरची तालुक्यासोबतच छत्तीसगड राज्यातील नागरिक व चंद्रपूर व गोंदिया जिल्यातून सुद्धा बहुतेक भाविक दाखल झाले होते.
या मंडईच्या देवतांचे पूजन व कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार कृष्णा गजभे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्ष कोरची, संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी, गटशिक्षणाधिकारी अमित दास, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, प्राचार्य देवराव गजभिये, माजी सदस्य जि प सदस्य प्रमिलाताई काटेंगे, नगरसेवक मेघश्याम जमकातन, रामसूराम काटेंगे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, आनंद चौबे, नंदू वैरागडे, शालीकराम कराडे, धनिराम मडावी, मनोज टेंभुर्णे, नंदू पंजवानी, चतुर सिंद्राम, महेरसिंग काटेंगे, रवी नंदेश्वर, सदाराम नुरुटी आदी उपस्थित होते.
या मंडईसाठी दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात या गावात राजमाता व मारुतीचे अतिशय जुने मंदिर आहे कुंमकोट येथील मंडई पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळते. वर्षागणिक भाविकांची गर्दी वाढत चालली आहे मंडई मध्ये खेळणी, झुले, कपडे, भाजीपाला, प्रसाद आधी विविध प्रकारची दुकाने लावली होती. दोन वर्षानंतर भाविकांच्या गर्दीने कुंमकोट गावाचा परिसर फुलून गेला होता. मंडईच्या दिवशी राजमाता व इतर देवी देवतांची विधिवत पूजा करण्यात आली यासाठी गावकरी आयोजकांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना सोयीसुधा पुरवल्या होत्या.
*कुमकोट राज राजेश्वरीदेवी-देवतांचे पूजेची सुरुवात राजवैद्य राजीमसाय रामसाय कल्लो पुजारीकडून होत असून सोबतीला 60 गावातील पुजारी उपस्थित असतात.*
कोरची तालुक्यातील कुंमकोट येथील मंडई प्रसिद्ध आहे मंडई निमित्ताने परिसरातील 60 गावांपेक्षा जास्त गावातील पुजारी एकत्र येऊन पारंपारिक पद्धतीने राजमातीची पूजा करतात. हातात संकल, त्रिशूल, बांबूचे झेंडे पकडून मंडईच्या सभोवताल तीन फेरे मारले जातात. त्यानंतर पूजेच्या शेवट होतो. हे फेरे बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते कोरची तालुक्यातील बहुतांश गावे छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहेत त्यामुळे या गावांमधील नागरिकांवर आदिवासी संस्कृती बरोबर छत्तीसगढी संस्कृतीचा प्रभाव आहे मंडई नंतर रात्री छत्तीसगढी लोककला नृत्याचे आयोजन करण्यात आले या नृत्याच्या माध्यमातून रात्रभर नागरिक मनोरंजनाचे आंनद घेणार आहेत.
*आमदार व ग्रामसेवक संघटना तर्फे करण्यात आली होती पाण्याची व्यवस्था*
येणाऱ्या भाविकांसाठी कुमकोट येथे आमदार रामदास मसराम यांच्या तर्फे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती तसेच ग्रामसेवक संघटना कोरची यांनी सुद्धा भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती