मुंबई:- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी CTET अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या परीक्षेत बसण्यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरताना चुका केल्या आहेत. त्यांना आता ती सुधारण्याची संधी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) CBSE ने दुरुस्ती विंडो उघडली आहे (correction window is opened) 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत खुली राहील. या कालावधीत, उमेदवार CBSE CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देऊन सुधारणा करू शकतात.
अर्जदार फक्त नाव, जन्मतारीख, श्रेणी, पत्ता, नोकरीची स्थिती, मोबाईल क्रमांक, शिक्षण, परीक्षा केंद्र आणि भाषा यांमध्येच सुधारणा करू शकतात. उमेदवाराने CTET अर्जामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला ‘करेक्शन विंडो: CTET Dec- 2024’ वर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. यानंतर, तुम्ही ज्या श्रेणींमध्ये सुधारणा करू शकता त्या उघडतील. आता तुम्हाला जे काही बदलायचे आहे,म त्यात बदल करा.यानंतर फॉर्म सबमिट करा.
CBSE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, CTET परीक्षा 14 डिसेंबर 2024 (शनिवार) रोजी घेतली जाईल. कोणत्याही शहरात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास 15 डिसेंबर 2024 (रविवार) रोजीही परीक्षा घेतली जाऊ शकते. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील. प्रवेशपत्र कोणत्याही उमेदवाराला पोस्टाने किंवा इतर माध्यमातून पाठवले जाणार नाही.
परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत पेपर 2, तर दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर 1 ची परीक्षा दुपारी 2:30 ते 5 या वेळेत घेतली जाईल. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा संपर्क क्रमांक 011-22240112 वर संपर्क साधू शकतात.