सन 2024-25 खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहिर
गडचिरोली,(जिमाका),दि.04: गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून खरिप पिकाची गावे 1557 आहेत. व एकूण पिका खालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरिप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गांवाची संख्या 05 आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीक नसलेली गांवे 58 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले 0 असून, 50 पैशाचे वर पैसवारी असलेल्या एकूण खरिप पिक असलेल्या गावांची संख्या 1504 आहेत. अशा प्रकारे एकूण 1504 गावांमधील खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहिर केलेली आहे. सबब गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम 2024-25 या वर्षाची अंतिम पैसेवारी 119.17 आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
0000